
जळगाव , 14 नोव्हेंबर (हिं.स.)शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही . जळगावातील एमआयडीसी परिसरातील आर्यावर्त प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत होते.दरम्यान, नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळी महानगरपालिकेच्या ५ ते ६ बंबांद्वारे आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर