
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापूर महापालिका आरक्षणामुळे आता सोलापूर शहरातील संभाव्य लढती जवळजवळ निश्चित झाल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी आणि लक्षवेधी लढत ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते मनोज शेजवाळ यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या भागात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर हे मनोज शेजवाळ यांच्यासोबत 2017 च्या वेळी एकत्र निवडून आले होते यापूर्वी वानकर यांच्या आई शेजवाळ यांच्यासोबत नगरसेविका होत्या. आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत.शेजवाळ हे एकनाथ शिंदे गटात आणि गणेश वानखडे उद्धव ठाकरे गटात आहेत त्यामुळे या प्रभागात मनोज शेजवाळ यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांना सर्वसाधारण म्हणून लढावे लागणार आहे आणि सहाजिकच ही लढत गणेश वानकर यांच्या विरोधात होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड