नवले पुलावरील अपघातास जबाबदार ट्रक चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा
- चालक, क्लिनर वगळता अन्य मृत आणि जखमींची ओळख पटली पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक च
नवले पुलावर भीषण अपघात


- चालक, क्लिनर वगळता अन्य मृत आणि जखमींची ओळख पटली

पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनर चालक आणि त्याचा क्लीनर यांचादेखील आगीत होरपळून मृत्यू झाला.

या प्रकरणी ट्रक चालक रुस्तम रूदार खान (वय ३५, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय ३१, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान), ताहीर नासीर खान (वय ४५, रा. किसनगड, राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अपघातात ट्रक चालक रुस्तम खान, क्लिनर मुस्ताक खान यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातात ताहीर खान गंभीर होरपळला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 (ए), (बी), 324 (4), मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या कंटेनरने 10 ते 12 वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 9 ते 10 जण गंभीररित्या जखमी झाले. गुरुवारी (13 नाेव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सेल्फी पॉइंटजवळ झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात झालेल्या मृतांची आणि जखमींची नावं

पल्स हॉस्पिटल येथील रुग्णांची माहिती

कारमधील मृत व्यक्तींची नावं

1) स्वाती संतोष नवलकर (37), ओळखणारे संतोष नामदेव नवलकर रा. धायरी फाटा (पुणे) यांची पत्नी

2) शांता दत्तात्रय दाभाडे (54), ओळखणारे संतोष नवलकर यांची सासू

3) दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (58) रा. धायरी फाटा (पुणे) ओळखणारे संतोष नवलकर यांचे सासरे

4) मोक्षिता हेमकुमार रेड्डी (3 वर्ष) रा. चिखली (पुणे), ओळखणारे वडील हेमकुमार रेड्डी

5) कारचालक धनंजय कुमार कोळी (30) रा. चिखली (पुणे), मुळगाव जयसिंगपूर (कोल्हापूर), ओळखणारे महेश दुन्दप्पा गोणी भाऊजी

6) मयत सिल्वर बर्च हॉस्पिटल : रोहित ज्ञानेश्वर कदम (25, रा. सातारा)

ट्रकमधील मरण पावलेल्या दोघांची ओळख पटलेली नाही, असे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला.

नवले हॉस्पिटल येथील जखमी रुग्णांबाबत माहिती - 1. सय्यद शालीमा सय्यद, 2. जुलेखा अमजद सय्यद (32), 3. अमजद सय्यद (40) सर्व राहणार भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे, 4. सतीश वाघमारे (35, रा. नांदेड), 5. सोहेल रमनुद्दीन सय्यद (20, रा. चाकण (पुणे), 6. शामराव पोटे (79, रा. हिंजवडी (पुणे)

अडवांटेज हॉस्पिटल - 1. अंकित सालीयन (30, रा. आंबेगाव बुद्रुक पुणे)

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande