पुण्यात रिंग रोडच्या कामाला गती, 117 गावांचे सर्वेक्षण पूर्ण
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्याच्या प्रस्तावित वर्तुळाकार मार्गाच्या (रिंग रोड) भोवतालच्या 117 गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी या गावांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, येत्या दोन वर्षांत या गावांचा विकास आराखडा (डीपी) राज्य सरका
Ring Road Pune


पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्याच्या प्रस्तावित वर्तुळाकार मार्गाच्या (रिंग रोड) भोवतालच्या 117 गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी या गावांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, येत्या दोन वर्षांत या गावांचा विकास आराखडा (डीपी) राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. या गावांमध्ये शिक्षणसंस्था, गृहप्रकल्प (टाउनशिप) यांसह ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक पार्क, ट्रॉमा केअर यांसारख्या विविध घटकांशी संबंधित सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. पुण्याच्या रिंग रोडचे काम सुरू झाल्यानंतर ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या हद्दीतील हवेली, मुळशी, भोर, वेल्हे आणि पुरंदर या पाच तालुक्यांतील 117 गावांच्या नियोजनाची जबाबदारी ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’कडे (एमएसआरडीसी) दिली होती. या सर्व गावांचे क्षेत्र सुमारे 668 चौरस किमी आहे. या सर्व गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याचा आदेश सरकारने ‘एमएसआरडीसी’ला दिल्यानंतर सर्व गावांतील सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले. या सर्वेक्षणानंतर झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या गावांच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande