
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। भरणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू पैलवान निकंबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अधिकृत रित्या प्रवेश करण्यात आला.कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी राष्ट्रवादी परिवारात स्वागत करत, पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या व सर्वांनी मिळून एकजुटीने एक दिलाने काम करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावा अशी भावना व्यक्ती केली.
विष्णू पैलवान निकंबे यांनी सोलापूर महानगरपालिका 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महानगर पालिकेचे उपमहापौर पद भूषविले आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना या पक्षाकडून विष्णु निकंबे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड