
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आईचा खून केल्याचा आरोप असलेल्या मुलाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिकेत शशिकांत तेली असे या आरोपीचे नाव असून, तो गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात होता.
अनिकेतने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेत रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
गेल्या २५ ऑगस्टच्या रात्री अनिकेतने चाकूने आपल्या आई पूजा शशिकांत तेली (वय ५०) यांचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतःच्या हातावर वार करून ड्रेनेज क्लिनर प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला, असा गुन्हा रत्नागिरी पोलिसांनी दाखल केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी