
जळगाव , 14 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील सराफ बाजारात चालू आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेत विक्रमी दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. एकाच दिवसात सोने दरात प्रति तोळा २८८४ रुपयांनी वाढून एक लाख ३० हजाराच्यावर गेले. एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु झाले असताना सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना धक्का बसला. मात्र दुसऱ्याच दिवशी आज शुक्रवार सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.चांदीचा दर देखील घसरण. त्यामुळे सर्वसामान्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.जळगाव सराफ बाजारात आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच १२३६ रूपयांची घट नोंदवली गेली. परिणामी, सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख २९ हजार ६६८ रूपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झाली. आज सकाळी चांदीत ३०९० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ६६ हजार ८६० रूपयांपर्यंत खाली आले. सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. मागील वर्षभरात सोन्याचे दर जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याचे दर वाढण्यामागे जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार जबाबदार आहे. याचसोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले आहेत. व्याजदरात कपात झाल्याने सोन्याचे दर सोन्यातील गुंतवणूक जास्त प्रमाणात वाढत आहेत. याचसोबत डॉलरचे दर घसरल्यानेदेखील त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर