सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 : वरुण चक्रवर्तीची तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती
नवी दिल्ली , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याची सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 साठी तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून तमिळनाडू आपला पहिला सामना राजस्थानविरुद्ध खेळ
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 : वरुण चक्रवर्तीची तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती


नवी दिल्ली , 14 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याची सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 साठी तमिळनाडूच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून तमिळनाडू आपला पहिला सामना राजस्थानविरुद्ध खेळणार आहे. नारायण जगदीसन संघाचे उपकर्णधार असतील. कोणत्याही स्तरावर ही वरुण चक्रवर्ती यांची पहिलीच कर्णधारपदाची जबाबदारी असेल. त्यांनी एम. शाहरूख खान यांच्या जागी ही भूमिका स्वीकारली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत चक्रवर्ती यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन डावांमध्ये एकूण ५ बळी घेतले होते.

भारतातर्फे ४ वनडे सामन्यांत १० बळी आणि २९ टी20 सामन्यांत ४५ बळी मिळवलेल्या चक्रवर्ती यांनी २७ लिस्ट-ए सामन्यांत ६९ बळी घेतले आहेत. तसेच, एकमेव फर्स्ट-क्लास सामन्यात त्यांनी १ बळी मिळवला. भारताचे डावखुरे वेगवान गोलंदाज टी. नटराजन आणि गुरजपनीत सिंह यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आर. सिलंबरासन, आर. साई किशोर आणि एम. सिद्धार्थ यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत तमिळनाडूचा संघ एलीट गट–डी मध्ये आहे. या गटात तमिळनाडूसह दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, कर्नाटक, त्रिपुरा, सौराष्ट्र आणि झारखंड यांच्या संघांचाही समावेश आहे. सध्याच्या रणजी ट्रॉफीत तमिळनाडूची कामगिरी साधारण राहिली आहे. चार सामन्यांत दोन पराभव आणि दोन बरोबरीनंतर संघ आपल्या गटात सहाव्या स्थानी आहे. झारखंडविरुद्ध डाव आणि 114 धावांनी पराभव पत्करल्यानंतर नागालंड आणि विदर्भ यांच्याविरुद्धची सामने ड्रॉ झाले, तर आंध्रप्रदेशविरुद्धचा सामना तमिळनाडूने ४ विकेटने गमावला.

तमिळनाडू संघ (सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26):वरुण चक्रवर्ती (कर्णधार), नारायण जगदीसन (उपकर्णधार/यष्टिरक्षक), तुषार रहेजा (यष्टिरक्षक), व्ही.पी. अमित सात्विक, एम. शाहरूख खान, आंद्रे सिद्धार्थ, प्रदोष रंजन पॉल, शिवम सिंह, आर. साई किशोर, एम. सिद्धार्थ, टी. नटराजन, गुरजपनीत सिंह, ए. इसाक्कीमुथु, आर. सोनू यादव, आर. सिलंबरासन आणि एस. रितिक ईश्वरन (यष्टिरक्षक).

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande