उजास–इवोनिक इंडिया करार; मुंबईतील शाळांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेसाठी पुढाकार
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। अद्वैतेशा बिर्ला यांनी स्‍थापना केलेल्‍या आदित्‍य बिर्ला एज्‍युकेशन ट्रस्‍टचा उपक्रम उजासने इवोनिक इंडियासोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी करण्‍याची घोषणा केली. या करारांतर्गत मुंबई व नवी मुंबईतील शाळांमध्‍ये स
Ujas signs MoU with Evonik India


मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। अद्वैतेशा बिर्ला यांनी स्‍थापना केलेल्‍या आदित्‍य बिर्ला एज्‍युकेशन ट्रस्‍टचा उपक्रम उजासने इवोनिक इंडियासोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी करण्‍याची घोषणा केली. या करारांतर्गत मुंबई व नवी मुंबईतील शाळांमध्‍ये संरचित मेन्‍स्‍ट्रूअल हायजिन मॅनेजमेंट (एमएचएम) जागरूकता उपक्रम राबवण्‍यात येईल. या उपक्रमामधील सहभागी शाळांपैकी एक व्‍हीडीएस, पब्लिक स्‍कूल, तुर्भे येथे या सामंस्‍यज करारावर औपचारिकरित्‍या स्‍वाक्षरी करण्‍यात आली.

उजासमधील पूनम पाटकर (उजास युनिटच्‍या प्रमुख) व स्‍टेफी फर्नान्‍डो (वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक), तसेच विनोद पारेमल (इवोनिक इंडिया रिजिनचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक), विद्या गोपीनाथ (इवोनिक इंडियासाठी सीएसआर लीड म्‍हणून इंडो-जर्मन चेम्‍बर ऑफ कॉमर्सच्‍या प्रतिनिधी) आणि इवोनिक इंडियामधील प्रेरणा सकपाळ (वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक, कम्‍युनिकेशन्‍स) यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमाचा वंचित समुदायांमधील ३९८ मुली, ६०२ मुले व ४० महिला अशा १,००० हून अधिक व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचत मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाची काळजी व स्‍वच्‍छतेबाबत जागरूकता, शिक्षण आणि खुल्‍या चर्चेला चालना देण्‍याचा मनसुबा आहे.

या उपक्रमाचे शीर्षक आहे 'ग्रो बीयॉण्‍ड युअरसेल्‍फ - एमएचएम अवेअरनेस सेशन्‍स बाय उजास'. या उपबक्रम गुरूकुल इंग्लिश हायस्‍कूल, मालवणी-मालाड; जीवनज्‍योती इंटरनॅशनल स्‍कूल, मालवणी-मालाड; ऑक्‍सफोर्ड इंग्लिश हायस्‍कूल, कमानी, मुर्ला आणि व्‍हीडीएस पब्लिक स्‍कूल, नवी मुंबई येथे राबवण्‍यात येईल.

मासिक पाळीबाबत गैरसमजांचे निराकरण करण्‍यासाठी आणि आरोग्‍य साक्षरतेला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली जागरूकता सत्रे मुलींना यौवन, मासिक पाळी आणि त्यांचे प्रजनन आरोग्य समजून घेण्यास मदत करतात, ज्यामुळे त्‍यांना त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल स्‍पष्‍ट माहिती मिळते. ही सत्रे त्‍यांना मासिक पाळीची स्वच्छता, सुरक्षित उत्पादनांचा वापर आणि शाश्वत विल्हेवाट लावण्याच्‍या योग्‍य पद्धती शिकवतात, मुलींना आत्मविश्वासाने मासिक पाळीसंदर्भात नियोजन करण्यास, गैरसमज दूर करण्यास, त्यांच्या मासिक पाळी चक्रांचा मागोवा घेण्यास आणि आत्मविश्वास व आत्म-जागरूकता वाढवण्यास सक्षम करतात.

मुलांसोबतच्या सत्रांमध्ये त्यांना घरी, शाळेत आणि त्यांच्या समुदायात आदरयुक्‍त, दयाळू आणि सहाय्यक राहण्यास प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. मातांसाठी विशेष सत्रांमध्ये पीसीओडी/पीसीओएस, रजोनिवृत्ती आणि मासिक पाळीदरम्यान त्यांच्या मुलींना कसा आधार द्यायचा यावर चर्चा देखील करण्‍यात येईल.

उजास इम्‍पॅक्‍ट रिपोर्ट २०२४-२०२५ मधील नुकतेच माहितींमधून अशा हस्‍तक्षेपांचे महत्त्व दिसून येते. या अहवालाच्‍या निष्‍पत्ती पुढीलप्रमाणे:

उजास उपक्रमामध्‍ये सहभाग घेतलेल्‍यांपैकी ९८ किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत स्‍पष्‍ट माहिती असल्‍याचे दिसून आले.

९४ टक्‍के मुलींनी मासिक पाळी स्‍वच्‍छता उत्‍पादने ओळखली, जेथे उत्‍पादन साक्षरतेमध्‍ये ४२ टक्‍के वाढ झाली.

मासिक पाळीबाबत माहित असलेल्‍या मुलांमध्‍ये ४७ टक्‍के वाढ झाली आणि ७४ टक्‍के मुलांना महिला नातेवाईकांसोबत मासिक पाळीबाबत चर्चा करणे सोईस्‍कर वाटले, ज्‍यामधून वाढती सर्वसमावेशकता दिसून येते.

या उपक्रमाने गैरसमज देखील मोठ्या प्रमाणात कमी केले, जेथे ९५ टक्‍के एनएसएस विद्यार्थ्‍यांनी मासिक पाळी लज्‍जास्‍पद नाही तर नैसर्गिक मानले, तसेच ८६ टक्‍के किशोरवयीन मुलींनी मासिक पाळीचे रक्‍त अशुद्ध असते ही कल्‍पना नाकारली.

सामुदायिक शिक्षणामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांमध्ये, ९६ टक्‍के सेविका आत्मविश्वासाने मासिक पाळीचे स्पष्टीकरण देऊ शकल्या आणि ९४ टक्‍के सेविका वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या असामान्य मासिक पाळीच्या लक्षणांना ओळखू शकल्या.

ही माहिती मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याची घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी उजासच्या परिवर्तनकारी भूमिकेला दृढ करते आणि शालेय स्‍तरावर जागरूकता उपक्रम राबवत तरूणांशी संलग्‍न होण्‍याची गरज निदर्शनास आणते.

या सहयोगांतर्गत उजास शाळांमध्ये जागरूकता व शैक्षणिक सत्रे राबवेल, तर इवोनिक इंडिया या उपक्रमाला निधी देईल, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्‍नांना पाठिंबा देईल.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत उजासच्‍या प्रमुख पूनम पाटकर म्‍हणाल्‍या, ''या सहयोगामधून मासिक पाळीबाबत शिक्षणासाठी सुरक्षित व सर्वसमावेशक जागा निर्माण करण्‍याप्रती सहयोगात्‍मक महत्त्वाकांक्षा दिसून येते. उजासमध्‍ये आमचा विश्वास आहे की मासिक पाळी आरोग्‍य फक्‍त महिलांची समस्‍या नाही तर सामाजिक समस्‍या आहे, ज्‍यासाठी समाजाच्‍या सर्व स्‍तरांकडून सहानुभूती, जागरूकता व सहभागाची आवश्‍यकता आहे.''

२०२१ मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून उजासने भारतभरात १७,००० हून अधिक जागरूकता सत्रे आयेाजित केली आहेत, ज्‍या माध्‍यमातून ६ लाखांहून अधिक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणल आहे आणि ५० लाखांहून अधिक सॅनिटरी नॅ‍पकिन्‍स वितरित केले आहेत. त्‍यांच्‍या मेन्‍स्‍ट्रुअल हेल्‍थ एक्‍स्‍प्रेसने देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवास केला आहे, ज्‍याअंतर्गत समुदायांशी संलग्‍न झाले आहे आणि तळागाळापासून मासिक पाळीदरम्‍यान आरोग्‍याच्या घ्‍यावयाच्‍या काळजीबाबत जागरूकतेचा प्रसार करत आहे.

आपल्‍या शिक्षण व आऊटरिच प्रयत्‍नांसोबत उजास महिला-नेतृत्वित, शाश्वत कापडी पॅड उत्‍पादन युनिट्सच्‍या माध्‍यमातून आर्थिक सक्षमीकरणाला देखील चालना देत आहे, ज्‍याची सुरूवात जालनामधील पहिल्‍या युनिटच्‍या यशस्‍वी लाँचसह झाली आहे. अधिक पुढे जात, उजासचा महाराष्‍ट्रातील अधिक जिल्‍ह्यांमध्‍ये व शहरांमध्‍ये आपली पोहोच वाढवत, उपलब्‍धता वाढवण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत, रोजगार निर्माण करत आणि तळागाळापासून पर्यावरणपूरक मासिक पाळी सोल्‍यूशन्‍सना चालना देत प्रभाव वाढवण्‍याचा मनसुबा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande