जि.परिषद, पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा पुणे जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया निर्दोष
ZP pune


पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया निर्दोष, शांततामय आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. येत्या बुधवारी, नोव्हेंबर रोजी तयारीचा पुनरावलोकन आढावा पुन्हा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, जिल्हास्तरीय प्रमुख नोडल अधिकारी श्रीमती चारूशिल देशमुख तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती, निवडणूक साहित्याची उपलब्धता, ईव्हीएम-तपासणी, तसेच मतदान केंद्रांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता यासंबंधी प्राधान्याने चर्चा झाली. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करून त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेला अधिक सतर्क ठेवण्या बाबतची तयारी. मतदान कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्था यांसारख्या सुविधा निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पूर्ण ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या शून्य त्रुटी तत्त्वावर पूर्ण करून रोजची प्रगती अहवाल स्वरूपात सादर करावा, सर्व स्तरांवर योग्य तो समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठीचे दिशा निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande