सोलापूर - उमेदवारांसाठी सुटीतही सुरू राहणार जात पडताळणी कार्यालय
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत जात व
ZP news solpaur


सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावाची पोच जोडण्याचे बंधन आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी समितीच्या कार्यालयात होऊ लागली आहे. त्यामुळे आता शनिवारी व रविवारी देखील कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे.

नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. ‘अ’ वर्गातील नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास तीन हजार रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना १५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. तर ‘ब’ वर्गातील नगरपरिषदांसाठी दोन आणि एक हजार रुपये अनामत रक्कम आहे. ‘क’ वर्गातील नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना अवघे ५०० रुपये डिपॉझिट (अनामत रक्कम) भरावे लागत आहे. अजूनही महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande