बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन
मुंबई, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलिवूडमधील सर्वात ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशलयांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. कामिनी कौशल यांच्या मागे त्यांचे पुत्र श
चित्रपट


मुंबई, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलिवूडमधील सर्वात ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशलयांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. कामिनी कौशल यांच्या मागे त्यांचे पुत्र श्रवण, विदुर आणि राहुल सूदहे आहेत.

”कामिनी कौशल यांनी १९४६ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून केली होती. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी, १९२७ साली झाला. कामिनी कौशल यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही पडद्यावर काम केले होते.

कामिनी कौशल यांनी केलेले उल्लेखनीय चित्रपटं

कामिनी कौशल यांनी शहीद, नदिया के पार, शबनम, आरज़ू, बिराज बहू, दो भाई, ज़िद्दी, पारस, नमूना, झंझर, आबरू, बड़े सरकार, जेलर, नाइट क्लब अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांचा ‘नीचा नगर’ चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सर्वोत्तम चित्रपट’ पुरस्कार मिळाला होता. चित्रपटासोबतच त्यांनी दूरदर्शनवरील ‘चांद सितारे’ या मालिकेतही काम केले होते.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या को-स्टार

धर्मेंद्र यांच चित्रपट ‘शहीद’ मध्ये कामिनी कौशल त्यांच्या पहिल्या को-स्टार होत्या. धर्मेंद्र यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून,

“माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट शहीद ची हिरोईन कामिनी कौशल यांची पहिली भेट… दोघांच्या चेहऱ्यावर हसू… एक प्रेमळ ओळख” असे लिहिले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande