कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी परिचय मेळावे उत्तम पर्याय - माजी महापौर योगेश बहल
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। स्पर्धेच्या काळात युवक, युवती करिअर करण्यासाठी जास्त वेळ घालवत आहेत. उच्च शिक्षण त्यानंतर नोकरी, व्यवसाय यामध्ये लग्नाचे वय वाढत आहे. त्यात वधू, वरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा जुळणे कठीण होत जाते. कुटुंब
कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी परिचय मेळावे उत्तम पर्याय - माजी महापौर योगेश बहल


पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।

स्पर्धेच्या काळात युवक, युवती करिअर करण्यासाठी जास्त वेळ घालवत आहेत. उच्च शिक्षण त्यानंतर नोकरी, व्यवसाय यामध्ये लग्नाचे वय वाढत आहे. त्यात वधू, वरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा जुळणे कठीण होत जाते. कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी असे वधू, वर परिचय मेळावे हा एक उत्तम पर्याय आहे. खान्देश माळी मंडळ आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे असे माजी महापौर योगेश बहल यांनी सांगितले. खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेला अखिल माळी समाज २७ वा राज्यव्यापी भव्य वधु, वर, पालक परिचय मेळावा आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, पुणे येथे संपन्न झाला यावेळी बहल बोलत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष गुलाब माळी, मंडळाचे अध्यक्ष नकुल महाजन, प्रा. कविता आल्हाट, प्रवीण महाजन, धुळे माळी महासंघाचे आर. के. माळी, मंडळाचे माजी अध्यक्ष पी. के. महाजन, नानाभाऊ माळी, वधू, वर समिती प्रमुख उदयभान पाटील, गणेश चौधरी, योगेश माळी, संस्थापक एस. के. माळी, मंडळाचे रमेश सोनवणे, प्रशांत महाजन, खजिनदार रवींद्र माळी, संघटक दीपक बागुल, रजनी वाघ, सुधाकर बोरसे, ज्ञानेश्वर वाघ, सुधीर‌ महाजन, जेष्ठ सल्लागार भिमराव माळी आदी उपस्थित होते. या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनिअर, सीए, उच्चशिक्षित, सर्वसामान्य, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक २५० पेक्षा अधिक युवक, युवतींनी सहभाग घेतला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande