
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।माढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत व सीनेच्या महापुरामुळे महावितरणचे सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून माढा उपविभागांतर्गत 220 डीपींचे नुकसान झाले आहे. ही कामे महावितरणकडून आता युद्धपातळीवर सुरू आहे. नदीकाठीच्या मोटारी सुरू झाल्यानंतर सुरळीत वीज पुरवठ्याचे आव्हान महावितरण पुढे असणार आहे.
माढा तालुक्यात मे महिन्यातच काही मंडळात तर सप्टेंबरमध्ये संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. सप्टेंबर महिन्यात सीना नदीला आलेल्या महापुराने नदीकाठी असलेल्या माढा विभाग अंतर्गत येणाऱ्या खैराव, कुंभेज, वाकाव, उंदरगाव, केवड, दारफळ, निमगाव मा. राहुलनगर, चव्हाणवाडी व मानेगाव परिसरातील काही भागात वीज वितरण कंपनीच्या नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या भागातील 220 डीपींचे नुकसान झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड