
सोलापूर, 14 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे तात्पुरत्या स्वरूपात एक स्वयंपाकी पद भरावयाचे असून, ही भरती एकत्रित मानधनावर केली जाणार आहे. स्वयंपाकी पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.या भरतीसाठी माजी सैनिक विधवा पत्नी यांनी आपले अर्ज व शैक्षणिक तसेच अनुभवाचे कागदपत्रांसह दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जर माजी सैनिक विधवा पत्नी उपलब्ध नसतील, तर नागरी जीवनातील पात्र उमेदवारांचा विचार केला जाईल.मानधन रुपये 14,106/- प्रतिमहा निश्चित करण्यात आले असून, मुलाखती दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात घेण्यात येणार आहेत.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही भरती प्रक्रिया सैनिकी मुलांच्या देखभालीसाठी आवश्यक असून, सेवाभावी उमेदवारांनी पुढे यावे, असेही त्यांनी स्पष्ट केल
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड