पुणे - समाविष्ट गावांचा २४ कोटीचा निधी वळवला
पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांमध्ये अद्याप विकासकामांना गती मिळालेली नसताना, या गावांचा तरतूद असलेला पाणी पुरवठ्याचा तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणासाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. या निधीतून
पुणे - समाविष्ट गावांचा २४ कोटीचा निधी वळवला


पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांमध्ये अद्याप विकासकामांना गती मिळालेली नसताना, या गावांचा तरतूद असलेला पाणी पुरवठ्याचा तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणासाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. या निधीतून जुन्या हद्दीतील पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.पाणीपुरवठा विभागासह इतर विभागांच्या विविध प्रकल्पांसाठी निधी अपुरा पडत असल्याने एकूण ५२ कोटींच्या विविध तरतुदींचे वर्गीकरण करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. त्यास वित्तीय समितीची मान्यता घेण्यात आली आहे.समाविष्ट गावात महापालिका कर जास्त घेते पण विकास कामे करत नाही. रस्ते, पाणी, विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापन केले जात नाही. सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे अशी तक्रार नागरिकांची असते. असे असताना त्यातच आता निधीची कपात करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande