सोलापूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून केंद्राने मागवला प्रस्ताव
सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (सिव्‍हिल) २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने डॉ. वैशंपायन स्‍मृती शासकीय वैद्
सोलापूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून केंद्राने मागवला प्रस्ताव


सोलापूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (सिव्‍हिल) २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने डॉ. वैशंपायन स्‍मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मागवला आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अंतर्गत यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांतील उपचार सुविधा आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण झाले नसल्याची बाब त्यातून पुढे आली.

वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नीत रुग्णालयात येणारा गरजू रुग्ण हा आर्थिक दुर्बल असल्याने याच रुग्णालयांवर अवलंबून असतो. तसेच, केंद्राच्या आरोग्य योजनांचा लाभार्थीदेखील या रुग्णालयात उपचार घेतो. त्यामुळे या संस्थांमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे युनिट सुरू करण्याची गरज समोर आली. त्यानुसार केंद्राने प्रस्ताव मागवला आहे. या प्रस्तावात मूलभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande