बीड : चालत्या बसमध्ये सोन्याचे दागिने चोरीला
बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। माहेरी जात असलेल्या विवाहित महिलेचे छोट्या पर्स मधून गंठण अज्ञात चोरट्याने चोरले आहे. ही घटना वडवणीच्या बीड रोडवरील बस पॉईंटला घडली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधिमाया दत्ता बडे (वय 2
बीड : चालत्या बसमध्ये सोन्याचे दागिने चोरीला


बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। माहेरी जात असलेल्या विवाहित महिलेचे छोट्या पर्स मधून गंठण अज्ञात चोरट्याने चोरले आहे. ही घटना वडवणीच्या बीड रोडवरील बस पॉईंटला घडली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधिमाया दत्ता बडे (वय 29 वर्ष) रा. खामगाव ता. परळी ही महिला वडवणी येथे मामाकडे आल्या होत्या. माहेरी खामगावकडे जाते वेळेस बसमध्ये चढत असताना छोट्या पर्स बॅगेत ठेवलेली गंठण 81,250/- एक सोन्याचे पटटी गंठण दोन तोळे अडीच ग्रॅम जुनी वापरती कि.अं. 81,050/-रु. किंमतीचे कोणीतरी आज्ञात चोरट्यांनी चोरुन नेहले आहे. म्हणून आदिमाया बडे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande