शेतकरी प्रश्नांवर मंगळवारी मुंबईत कृषिमंत्री भरणे यांच्या निवासस्थानाला घेराव
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। : छावा क्रांतिवीर सेनेची महाराष्ट्र राज्य आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली बैठकीला संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी म
शेतकरी प्रश्नांवर मंगळवारी मुंबईत कृषिमंत्री दत्ता  भरणे यांच्या घराला घेराव


नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।

: छावा क्रांतिवीर सेनेची महाराष्ट्र राज्य आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली बैठकीला संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,सध्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस उपाययोजना दिसून येत नाहीत.राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी आजवर ना जिल्हानिहाय दौरे केले,ना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले.स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घेणारे मंत्री शेतकऱ्यांना अस्मानी संकटात वाऱ्यावर सोडून देत आहेत,हे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे,असा तीव्र शब्दात निषेध त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वक्तव्यावरही टीका करताना म्हटले की,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असताना,दुसऱ्याच दिवशी अजित दादा ‘किती दिवस माफ करायचे’ असे बोलून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात.सत्तेच्या खुर्च्या या शेतकऱ्यांच्या घामावर उभ्या राहिल्या आहेत,हे त्यांनी विसरू नये.आपण निवडणूक लढताना शेतकरी कर्जमाफीचा आश्वासन दिले होते त्या आश्वासनाला सरळ सरळ नकार देणारे अजित पवार हे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन राज्याच्या राजकारणात कोणीही सत्तेत राहू शकत नाही हे माहीत असताना सुद्धा एवढी मस्ती कशासाठी अजित पवार करत आहे अजित पवारांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी मुंबई येथे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानावर छावा क्रांतिवीर सेनेतर्फे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी घेराव घालण्यात येणार आहे. बैठकीत नवनियुक्त राज्य कार्यकारिणी,विभागीय कार्यकारिणी तसेच नाशिक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख व तालुकाप्रमुख यांच्या महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande