
परभणी, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाने प्रभावित होऊन वंचित बहुजन आघाडी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी परभणी येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, परभणी येथे पार पडला. या वेळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या संघटन बळकटीस हातभार लावला.
या सोहळ्यात वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे यांच्यासह अभिजीत भालेराव, सागर गवारे, तातेराव जाधव, आकाश वाटुरे, संतोष जयस्वाल, करण इंगोले, कृष्णा वाघमारे, सचिन गायकवाड, सिद्धार्थ इंगोले, सुनील घुगे, राहुल पंडित आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी नव-नियुक्त मागासवर्गीय विभाग जिल्हाप्रमुख अमित भालेराव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत मार्गदर्शन केले. युवकांनी शिवसेनेच्या सबळ नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील संघटन अधिक सक्षम व मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, शहर प्रमुख सचिन बाळासाहेब पाटील, मागासवर्गीय विभाग जिल्हाप्रमुख अमित भालेराव, तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis