
अमरावती, 2 नोव्हेंबर (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यातील तंत्रशिक्षण व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारण्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात खाजगी सहभागातून सीआयआयआयटीच्या कौशल्यवर्धन केंद्रांची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या संदर्भात आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी मागील सहा महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून हजारो उमेदवारांना तांत्रिक प्रशिक्षणासह उद्योगसिद्ध अभियंते घडविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आधुनिक उद्योगविश्वात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास आता आधुनिक उद्योगविश्वात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास व रोजगार निर्मिती होण्यासाठी अमरावती जिल्ह्य़ातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे सीआयआयआयटी केंद्र उभारण्यास मान्यता मिळण्याबद्दल आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इक्यूबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT ) प्रकल्पाची उभारणी करण्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या २५ मार्च रोजी पत्र जारी करून तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश निर्गमित केले. तदनंतर गेल्या १५ एप्रिल रोजी मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व आमदारांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये सीआयआयआयटी युनिट उभारण्याबाबत पुढाकार घेऊन प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती.
त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे कुशल-संसाधने आणि उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने व त्यांना भरमसाठ नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सीआयआयआयटी कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यासंदर्भात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी २० जुन २०२५ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य यांच्याकडून प्रस्ताव मागविला होता. तदनंतर या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार तसेच शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला.
टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड द्वारा भारतात कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम राज्यात हे यशस्वीरित्या कौशल्यवर्धन केंद्र पूर्ण केले आहे महाराष्ट्र सरकारच्या मदतीने गडचिरोलीमध्येही असेच केंद्र यशस्वीरित्या सुरू केले आहे. त्याच धर्तीवर अमरावती जिल्ह्यात सुद्धा सीआयआयआयटीच्या कौशल्यवर्धन केंद्रांची उभारणी करण्याबाबत आ.सौ.सुलभाताई खोडके यांचा मागील सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरु असल्याने या संदर्भात आता मान्यता देण्यात आली आहे. अमरावती येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सीआयआयआयटीकेंद्र उभारणीस मान्यता देण्यात आले असल्याबाबत टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड चे उपाध्यक्षचे उपाध्यक्ष सुशील कुमार यांनी नुकताच दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी अजितदादा पवार यांना पत्राद्वारे कळविले आहे.
सदर प्रकल्पाच्या इमारत बांधकाम व प्रशिक्षण खर्चाला जवळपास २०० कोटी रुपये खर्च लागणार असून त्यापैकी १६२ कोटींचा खर्च टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड आणि भागीदार कंपन्या करतील आणि १५ टक्के खर्च हा महाराष्ट्र शासनाद्वारे अमरावती जिल्हा नियोजनातून उचलण्यात येणार आहे. या प्रकल्पामधून देशातील उद्योगांना कौशल्यांची वाढती गरज पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना भविष्यात जवळच्या उद्योग केंद्रांसाठी तयार करता येईल. केंद्र सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ७,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. हा प्रकल्प अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु करण्यास शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सुद्धा जागे संदर्भात मान्यता दिल्याने दिलेल्या आहे अमरावतीच्या सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इक्यूबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT ) प्रकल्पामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाधारित प्रशिक्षण, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान,अश्या कौशल्येवर्धन प्रशिक्षण मिळणार असून याला टाटा टेक्नॉलॉजीज व इतर अग्रगण्य उद्योगांचे सहकार्य लाभणार आहे.अमरावती जिल्ह्यात तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, आयटीआय, कॉम्पुटर सायन्स सारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या शासकीय व खासगी संस्था आहे. त्यामुळे अमरावती येथे सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन , इक्यूबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT ) हा प्रकल्प उभारल्यास जिल्यातील विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, तसेच आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पद्धतीने अद्यावत होण्यास मदत होणार आहे. सोबतच उद्योग संघ व एमआयडीसी यांच्या करिता कुशल मनुष्यबळ स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देता येईल.
भारतातील कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी व चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढविण्यासाठी अमरावती येथे उच्चस्तरीय प्रशिक्षणाची सोय म्हणून अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन , इक्यूबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT ) हा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यातून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या कौशल्यवृद्धीसाठी अनोखी संधी उपलब्ध होणार असल्याने आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी