
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे भाविकांसाठी मोफत कोकम सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्यासह सोनाली केसरकर, नीलेश आखाडे, संदीप सुर्वे, संतोष सावंत, समीर वस्ता, केतन कडू, सिद्धेश कडू, सचिन गांधी, गुरुप्रसाद फाटक, अमित विलणकर, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, प्रसाद बाष्ट्ये, मुक्ता बाष्ट्ये, तुषार देसाई, विनय मसुरकर, सौ. मसुरकर, कामना बेग, प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, प्रवीण रायकर सिद्धेश नाईक प्रवीण ढेकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भाविकांची सेवा हेच आमचे कर्तव्य असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला, असा संदेश आयोजकांकडून देण्यात आला.या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ८१०० भाविकांना सेवा देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी