बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा आढावा बैठक
बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा आढावा बैठक अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाझेर काजी यांच्या उपस्थितीत बीड येथील पक्ष कार्यालयात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ता
राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा आढावा बैठक


बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा आढावा बैठक अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाझेर काजी यांच्या उपस्थितीत बीड येथील पक्ष कार्यालयात पार पडली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने ही बैठक घेण्यात आली आगामी निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.या बैठकीस उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मान्यवरांनी संबोधित केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेश्वर चव्हाण यांच्यासह प्रदेश प्रवक्ते श्री.भागवत तावरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुधीर काकडे, जेष्ठ नेते मोईन मास्टर, फारूक पटेल, शेख निजामभाई, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई खोसरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य आनेराव, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रमीज शेख आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande