
छत्रपती संभाजीनगर, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक २२ आणि २३ मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनिती, प्रभागनिहाय जनसंपर्क अभियान, कार्यकर्त्यांचे समन्वय व संघटन बळकटीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. प्रभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत भाजपचा विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
विकास हेच आमचे ध्येय आणि जनसेवा हीच आमची दिशा — या भूमिकेवर ठाम राहून कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची भूमिका आणि कार्य पोहोचवण्याचे लक्ष्य ठरवले.
एकसंघ संघटन, ठाम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास — याच बळावर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे!
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis