नांदेड : भाजपची महत्वपूर्ण आढावा बैठक
नांदेड, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि पदवीधर मतदार नोंदणी विषयक देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्
भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक


नांदेड, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि पदवीधर मतदार नोंदणी विषयक देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

सदर बैठकीत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पदवीधर मतदार नोंदणी आदी संदर्भात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. सर्व निवडणूका संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. त्याप्रसंगी देगलूर विधानसभेचे आमदार जितेशजी अंतापुरकर, ग्रामीण जिल्हासरचिटणीस डॉ.माधवराव पाटील उच्चेकर, माणिकराव लोहगावे, भाजपा देगलूर-बिलोली विधानसभा प्रमुख कंत्तेवार जी, चंद्रशेखर सावळीकर, राजेंद्र रेड्डी देगलूर शहर अध्यक्ष प्रशांत दासरवार, ॲड प्रितम देशमुख, शिवकुमार देवाकडे, बीलोली मंडळाध्यक्ष मारोती राहिरे, शिवाजीराव बोधने, हनमलूं इरलावार,

शिवाजीराव देशमुख बळेगावकर, माधवराव मिसाळे गुरुजी, अनिल पाटील खानापूरकर, प्रकाश पाटील बेबरीकर, संतोष पाटील येरगिकर, अरविंद लक्ष्मणराव ठक्करवाड, सोशल मिडिया जिल्हा संयोजक संजय पांचाळ, यांच्यासह देगलूर बिलोली विधानसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande