
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : कंपनीचे शेअर्स नावावरती करण्याबरोबरच इतर हिस्सा घेण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नाशिक मध्ये घडली आहे विशेष म्हणजे भाजपा उद्योग आघाडीचे पदाधिकारी असणाऱ्या कैलास आयरे यांच्याबरोबर माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातू ने ही फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तक्रार करणारे भाजपचेच पदाधिकारी असून उद्योजक कैलास अहिरे, असे तक्रारदाराचे नाव आहे.कंपनीच्या शेअर्समध्ये भागीदारी करण्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी सुमारे दहा कोटींची रक्कम न देताच कंपनीचे शेअर्स परस्पर नावावर करून घेत सातपूरमधील उद्योजक कैलास अहिरे यांची सुमारे दहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर पोलिस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV