एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा ईशान शानबाग विजेता
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। : एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा नाशिक येथे संपन्न झाली . शहरात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे स्पर्धेसाठी बनवलेला ट्रॅक स्पर्धकांसाठी आवाहनात्मक बनला होता . इशान शानबाग याने डोळ्याचे
एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेचा ईशान शानबाग विजेता


नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।

: एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा नाशिक येथे संपन्न झाली . शहरात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे

स्पर्धेसाठी बनवलेला ट्रॅक स्पर्धकांसाठी आवाहनात्मक बनला होता . इशान शानबाग याने डोळ्याचे पारणे फेडणारे ड्रायव्हिंग करत विजेतेपद पटकावले . सर्व स्पर्धकांनी आपला जीव ओतून कामगिरी करत स्पर्धा अधिक रंगतदार बनवली .

आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे २०२५ सालच्या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा सर्वसाधारण विजेता इशान शानबाग ठरला .

भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया एफ एम एस सी आय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले होते .

सात वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील सत्तावीस वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे .

नाशिक मधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे ,मोहन पवार , हर्षल कडभाने ,विक्रम राजपूत , अमित सूर्यवंशीं ,आनंद बनसोडे व सहकारी यांनी सांभाळली होती. ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले होते .

सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात . उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो . दिवसोंदिवस या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे . प्रायोजक व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळत असलेल्या भरघोस सहकार्यामुळे सर्वच प्रकारच्या मोटरस्पोर्ट्सला प्रेक्षाकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला .

आपले कसब अजमावण्यासाठी विविध आठ गटातून ११० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते .

नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धाप्रकारातील बारकावे माहित असल्याने मैदानावर एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले होते .

या स्पर्धेसाठी एफएमएससीआय चे मुख्य प्रबंधक म्हणून रवी श्यामदासानी यांनी काम बघितले तर मनीष चिटको व सत्यजित नायक हे अधिकारी विशेष निमंत्रित होते.

शाम कोठारी यांच्या मार्गदर्शनानुसार सुरज कुटे व त्यांच्या सहकारी गटाने बनवलेल्या या मार्गावर १५ जम्पस , १ टेबलटॉप , व १ कट टेबलटॉप अश्या ट्रॅक वर वाहन चालवताना स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता . त्यामुळे प्रेक्षकांना नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळाली .

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे .

क्लास एक प्रथम :इशान शानबाग , द्वितीय :ऋग्वेद बारगुजे ,तृतीय : श्लोक घोरपडे .

क्लास दोन प्रथम : माणिकनंदन के , द्वितीय बासिल सनी , तृतीय : अमल वेरघेसे

क्लास तीन प्रथम : कथीरोली एस के . , द्वितीय : शैलेश कुमार , तृतीय : अभि एस नाथ

क्लास चार प्रथम : इम्रान पाशा , द्वितीय : अरुण टी . , तृतीय : सचिन डी .

क्लास पाच प्रथम : कार्तिक ए , द्वितीय : गौथम वी . एस. , तृतीय : अभि एस नाथ

क्लास सहा प्रथम : जितेंद्र सांगावे , द्वितीय : अक्षत हूपाले , तृतीय : एक्टोर इझाक

क्लास सात प्रथम : चैतन्य जोशी , द्वितीय : सुजान जे . , तृतीय : दर्शित चौहान

क्लास आठ प्रथम : विस्मय राम , द्वितीय : रिथिन साई , तृतीय : रिडा सय्यद .

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande