
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) | जिल्ह्यात कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज पहाटे रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाईची पूजा झाली. सौ. माधवी आणि श्री. गौरव मनोहर हेळेकर यांना प्रथम पूजेचा मिळाला. एकादशीच्या यात्रेनिमित्ताने मोठी गर्दी झाली आहे. पावसाने आज पूर्णपणे विश्रांती घेतल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
साटवली (ता. लांजा), लांजा, राजापूर, देवरूख, चिपळूण येथेही विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने यात्रा भरली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी