नाशिक : कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : युवकांचा शेतीतील सहभाग या विषयाला अनुसरून ''ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन'' व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि'' यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९८ पासून ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते
कृषीथॉन प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार जाहिर


नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : युवकांचा शेतीतील सहभाग या विषयाला अनुसरून 'ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन' व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि' यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९८ पासून ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या १८ व्या आवृत्तीचे आयोजन दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात येत आहे.

युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी संशोधन या क्षेत्रात केलेल्या विशेष वाटचालीची दखल घेऊन ‘प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार’ देऊन सन्मानित करणार आहोत. प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारासाठी डॉ. अरुण दत्तात्रय भगत {पुणे}, कानिफनाथ अण्णासाहेब बुरगुटे {उपले दुमाला, सोलापूर}, डॉ. सुचिता संजय भोसले {सातारा}, मुजम्मिल बेपारी {कोल्हापूर}, डॉ. श्रीधर निवास बन्ने {तासगाव, सांगली}, डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे {अकोला}, अभिषेक दिनकर दातीर {गणोरे, अहिल्यानगर}, डॉ. अमोल सुखदेव घाडगे {मुरडपु, बुलढाणा}, डॉ. महेश अप्पासाहेब आजबे {गांधेली, छत्रपती संभाजीवनगर }, श्रीराम महादेव म्हस्के {राहुरी, अहिल्यानगर}, डॉ. अश्विनी दिलीप सावळकर {सस्तूर, धाराशिव}, वैभव परमेश्वर गुळवणे {कोथळा खुर्द, जालना}, डॉ. योगीता मनोहर यादव {खेड, रत्नागिरी}, साजन सूर्यकांत हिंगोणेकर {नाशिक}, श्रुती गुराप्पा बिरादर {बोरगी खुर्द, सांगली} यांची निवड झाली आहे. अशी माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली .

निवड झालेल्या पुरस्कारार्थींना हे पुरस्कार नाशिकच्या ठक्कर्स डोम येथे १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या कृषीथॉन प्रदर्शनाच्या अठराव्या आवृत्तीमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande