डिजिटल युगात ग्रंथालये ज्ञानासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक - उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। ग्रंथालये, शिक्षणाची मंदिरे असून, तार्किक विचारक्षमतेला चालना देणारे आणि व्यक्ती आणि समुदायांना सक्षम करणारे स्थळ आहे. तसेच डिजिटल युगात ग्रंथालये ज्ञानासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक आहेत. असे उपराष्ट्रपती सी.पी.
Vice President C.P. Radhakrishnan


नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। ग्रंथालये, शिक्षणाची मंदिरे असून, तार्किक विचारक्षमतेला चालना देणारे आणि व्यक्ती आणि समुदायांना सक्षम करणारे स्थळ आहे. तसेच डिजिटल युगात ग्रंथालये ज्ञानासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक आहेत. असे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन म्हणाले.

केरळमधील संघटित ग्रंथालय चळवळीच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त पी.एन. पणिकर फाउंडेशनने शनिवारी त्रिवेंद्रममधील कनकक्कुन्नु पॅलेस येथे आयोजित केलेल्या ग्रंथालये सक्षमीकरण समुदाय - जागतिक दृष्टीकोन या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले. त्यांनी सांगितले की वाचन संस्कृती, डिजिटल साक्षरता आणि ज्ञानाद्वारे फाउंडेशनने समाजाला सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. फाउंडेशनचे घोषवाक्य वायचु वलरुका (वाचा आणि प्रगती करा) हे ज्ञान आणि समावेशकतेकडे समाजाला प्रेरित करत आहे.

श्री आदि शं‍कराचार्यांनी आध्यात्मिक जागरूकता आणण्यासाठी आणि विविध विचारांच्या एकत्रीकरणासाठी भारतभर प्रवास केला. असंख्य इतर ऋषी आणि विचारवंतानी त्यांच्या ज्ञानाने, करुणेने आणि दूरदृष्टीने आपली संस्कृती समृद्ध केल्याचे सांगितले. भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या मूल्यांविषयी बोलताना, उपराष्ट्रपतींनी महाकाव्यापासून ते आधुनिक ग्रंथालयांपर्यंत देशाच्या शैक्षणिक परंपरा राष्ट्राच्या ज्ञान आणि सामाजिक प्रगती यांचा शोध घेण्यास प्रेरणा देत आहे, असे निरीक्षण उपराष्ट्रपतींनी नोंदवले.

आजच्या डिजीटल युगात ग्रंथालये ज्ञानाची केंद्रे म्हणून काम करतात त्यामुळे लोकांना खरी माहिती मिळवणे आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्यास सक्षम करत असल्याचं सी. पी. राधाकृष्णन यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञानामुळे माहितीपर्यंत सुलभ शिरकाव करता येतो तर ग्रंथालये समाजामध्ये वैचारीक खोली, चिंतन आणि अर्थवाही संवाद विकसित करतात असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

आपल्या संदेशाचा समारोप करताना, उपराष्ट्रपती म्हणाले, ग्रंथालये ही शिक्षण,समावेश आणि नवोन्मेष यांसाठीच्या गतिमान जागा आहेत. ज्ञानाच्या ताकदीद्वारे लोकांना सक्षम करून देशभरातल्या सार्वजनिक आणि सामुदायिक ग्रंथालयाचे जाळे भक्कम करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande