दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे
कन्नड  तालुक्यातील सासेगाव येथे


छत्रपती संभाजीनगर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कन्नड तालुक्यातील सासेगाव येथे आज करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हा सोहळा केवळ पुतळा अनावरणाचा नव्हता, तर एका युगपुरुषाच्या अद्वितीय कार्य, त्याग आणि लोकसेवेच्या विचारांना अभिवादन करण्याचा क्षण होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या मुंडे यांचे कार्य आजही प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमास राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजना जाधव, माजी आमदार श्री.उदयसिंग राजपूत, श्री. नारायण पवार, माजी महापौर श्री भगवान बापू घडामोडे, जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अण्णासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय गव्हाणे, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, माजी पंचायत समिती सभापती आप्पाराव घुगे, केतन काजे, सुरेश गुजराणे, श्री कल्याण गांगोडे, सिनेट सदस्य श्री दत्ता भांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री किशोर पवार, श्री ललित सुराशे, बाळासाहेब सानप, माजी नगरसेवक श्री किशोर नागरे, भगवानगड मेहगाव अध्यक्ष सुधीरजी घुगे, तसेच श्री सागर पाले, श्री गणेश नागरे, बालाजी मुंडे, देवीदास जाधव, विष्णू खेडकर, राजेंद्र अवतारे, हरीश घुगे, श्री मयूर वंजारी, रामा मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या अनावरण सोहळ्यातील लोकसहभाग आणि श्रद्धा पाहता, लोकनेते मुंडे यांचे कार्य आणि विचार आजही जनमानसात तितक्याच ताकदीने जिवंत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण विकास आणि जनकल्याणाचा दीप पुढे नेत राहू हीच खरी श्रद्धांजली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande