लातूर : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चाकूरच्या कन्येची नेत्रदीपक कामगिरी
लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चाकूरच्या कन्येने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. चाकूरची कन्या कु. साक्षी सुजाता सुरेंद्र चाकूरकर यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत नेत्रदीपक
चाकूरच्या कन्येची नेत्रदीपक कामगिरी


लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चाकूरच्या कन्येने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. चाकूरची कन्या कु. साक्षी सुजाता सुरेंद्र चाकूरकर यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी, क्लास वन अधिकारी पद स्वतःच्या जिद्धीने आणि कष्टाने मिळविले.

यासंदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी संदेश देताना म्हटले आहे की, साक्षी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन!​

हा केवळ एक क्रमांक नाही, तर त्यांचे कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही यशाचे शिखर गाठता येते हे साक्षी यांनी सिद्ध केले. त्यांचे हे यश लातूरमधील गावागावातील प्रत्येक तरुणांना प्रेरणा देणारे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande