
नांदेड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।साडेतीन वर्षांपूर्वीच्या गुवाहाटी येथील बंडखोरीच्या काळात आमदार बालाजी कल्याणकर इतके तणावात होते की त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता.असा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात शिरसाट बोलत होते. यावेळी मंचावर आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोढारकर, बाबुराव कदम कोहळीकर, आणि मंगेश कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिरसाट म्हणाले, मी 42 वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्या आयुष्यातील ती तिसरी बंडखोरी होती, पण आमदार कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच होती. आम्ही संख्या मोजत होतो आणि कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवणही सोडलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती, ‘आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघावर काय परिणाम होईल?’ एवढ्या तणावाखाली ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते.” शिसाट पुढे म्हणाले की, “त्या काळात एखादी संख्या कमी झाली असती, आणि आम्ही बहुमतात आलो नसतो, तर आमची आमदारकी धोक्यात आली असती. पण कल्याणकर यांनी नंतर ज्या जोमाने काम केले, तो आदर्श आहे.” नांदेड उत्तर मतदारसंघात जितका विकास कल्याणकर यांनी केला, तितका याआधी कोणी केला नसेल. म्हणूनच ते दुसऱ्यांदा निवडून आले,” असं ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis