केंद्रीय कृषीमंत्री 7 नोव्हेंबर रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे
बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे येत्या 7 नोव्हेंबर रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे येत असून मयंक गांधी यांच्या सेवाभावी संस्थेने आयोजीत केलेल्या कृषी मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. बीड जिल्ह्या
मयंक गांधी यांच्या सेवाभावी संस्थेने आयोजीत केलेल्या कृषी मेळाव्याचे उद्घाटन


बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे येत्या 7 नोव्हेंबर रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे येत असून मयंक गांधी यांच्या सेवाभावी संस्थेने आयोजीत केलेल्या कृषी मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर पहिल्यांदाच केंद्रीय कृषीमंत्री येत आहेत. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती पाहण्यासोबत काही ठिकाणी दौरा करण्याचीही शक्यता आहे. सिरसाळा या ठिकाणी मयंक गांधी यांच्या सेवाभावी संस्थेने कृषीमेळावा आयोजीत केला आहे. सोबत काही या परिसरामध्ये वृक्षलागवडही करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. चौहान यांचा मात्र अद्याप प्रशासकीय दौरा आलेला नाही. मात्र सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमासोबत कृषी विभागानेही त्यांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने तयारी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande