नौदलाचा सर्वांत शक्तिशाली GSAT-7R (CMS-03) संप्रेषण उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित
- पंतप्रधान, नौदल प्रमुखांकडून कौतुक श्रीहरिकोटा, 2 नोव्हेंबर (हिं.स.) - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय नौदलासाठी तयार केलेले CMS-03 (GSAT-7R) कम्युनिकेशन सॅटेलाईट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात जड आणि अत
GSAT-7R (CMS-03) संप्रेषण उपग्रह


GSAT-7R (CMS-03) संप्रेषण उपग्रह


GSAT-7R (CMS-03) संप्रेषण उपग्रह


- पंतप्रधान, नौदल प्रमुखांकडून कौतुक

श्रीहरिकोटा, 2 नोव्हेंबर (हिं.स.) - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय नौदलासाठी तयार केलेले CMS-03 (GSAT-7R) कम्युनिकेशन सॅटेलाईट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात जड आणि अत्याधुनिक लष्करी सॅटेलाईट ठरले आहे. हे सॅटेलाईट इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटद्वारे श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज, रविवारी सायंकाळी 5:26 वाजता अवकाशात सोडण्यात आले. हा उपग्रह भारतीय नौदलाच्या जहाजं, विमानं, पाणबुड्या आणि सागरी ऑपरेशन केंद्रांमध्ये जलद आणि सुरक्षित संवाद प्रदान करेल.

हे सॅटेलाईट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले असून, ‘आत्मनिर्भर भारत’चे एक मोठे यश आहे. याचे वजन सुमारे 4400 किलोग्रॅम असून, यात अनेक देशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रान्सपोंडर्स बसवण्यात आले आहेत. हे उपकरण आवाज, डेटा आणि व्हिडिओ कम्युनिकेशन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्सवर सक्षमपणे हाताळतील.

इस्रोनं सांगितले की LVM3-M5 हे पाचवे ऑपरेशनल फ्लाइट आहे. यापूर्वी, इस्रोने 5 डिसेंबर 2018 रोजी फ्रेंच गयाना येथील कौरो प्रक्षेपण केंद्रावरुन एरियन-5 VA-246 रॉकेटच्या मदतीने त्यांचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह, GSAT-11 प्रक्षेपित केला होता. अंदाजे 5,854 किलोग्रॅम वजनाचा, GSAT-11 हा इस्रोने बनवलेला सर्वात वजनदार उपग्रह आहे. हा उपग्रह हिंदी महासागराच्या मोठ्या भागात मजबूत सिग्नल प्रदान करेल आणि अधिक डेटा हस्तांतरित करेल. तो संप्रेषण उपकरणांनी सुसज्ज आहे. या उपग्रहामुळं सागरी सुरक्षा, देखरेख आणि नौदल नेटवर्क क्षमता आणखी मजबूत होतील. या मोहिमेचं उद्दिष्ट सागरी क्षेत्रात सेवा प्रदान करणं आहे. LVM-3 रॉकेटनं यापूर्वी चंद्रयान-3 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले होते. ज्यामुळे भारत 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरणारा पहिला देश बनला. LVM-3 अंतराळयान, त्याच्या शक्तिशाली क्रायोजेनिक स्टेजसह, GTO ला 4,000 किलो आणि पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 8,000 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहे.

आजच्या काळात समुद्री सुरक्षा आणि गुप्तचर माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून वाढलेल्या आव्हानांमध्ये GSAT-7R नौदलासाठी एक धोरणात्मक ढाल ठरेल. समुद्रातील शत्रूंच्या हालचालींवर सतत नजर ठेवणे शक्य होईल. नौदलाच्या ऑपरेशन्सना रिअल-टाइम डेटा आणि कम्युनिकेशन सपोर्ट मिळेल. परदेशी उपग्रहांवर अवलंबित्व कमी होऊन भारताची तांत्रिक स्वायत्तता वाढेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या या यशाचे कौतुक करत म्हटले की, CMS-03 हे भारताच्या समुद्री सुरक्षेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. तर नौदल प्रमुखांनी सांगितले की, हे सॅटेलाईट भारताच्या ‘मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस’ क्षमतेला नवे बळ देईल आणि राष्ट्रीय सुरक्षेला मजबुती मिळवून देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande