
पिंपरी, 2 नोव्हेंबर (हिं.स.)पर्यावरण संवर्धन, हवामान बदल नियंत्रण आणि हरित जीवनशैलीचा प्रसार या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमात ‘हरित प्रतिज्ञा’ घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. यासाठी मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करताना किंवा हरित उपक्रमात सहभागी होताना एक छायाचित्र काढावे, ते समाजमाध्यमावर प्रसारित करावे. तसेच, महापालिकेच्या अधिकृत समाजमाध्यमातील पेजला ‘टॅग’ करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये वसुंधरा संवर्धन, हरित सवयी आणि जबाबदार नागरी सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, ‘माझी वसुंधरा’ मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून विशेष कार्ययोजना आखण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, उद्योगसंस्था, महिला बचत गट, रहिवासी संघटना आणि सामाजिक संस्था यांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु