
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात झाले.
मंडळाच्या सभागृहात बक्षीस वितरण समारंभ झाला. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. दोन्ही स्पर्धांसाठी जिल्हाभरातून स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. दोन्ही स्पर्धांसाठी प्रा. जयंत अभ्यंकर आणि प्रा. योगिनी भागवत यांनी परीक्षण केले. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी स्पर्धकांना उपयुक्त मार्गदर्शन केले. अविनाश काळे यांची स्पर्धा घेण्यासाठीची धडपड आणि प्रयत्न पाहून स्पर्धा कायम सुरू राहाव्या, यासाठी प्रा. अभ्यंकर यांनी मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी दिली. दोन्ही स्पर्धांमधील प्रथम क्रमांक विजेते कु. ओंकार आठवले आणि सौ. मंजुश्री भागवत यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
निबंध स्पर्धेचा निकाल -
प्रथम - सौ. मंजुश्री संजय भागवत, देवरूख
द्वितीय- कु. दीपिका पुरुषोत्तम देवरुखकर, गोळप
तृतीय - श्री. सुहास तानाजी गेल्ये, संगमेश्वर
उत्तेजनार्थ -
१) कु. वल्लरी विनायक मुकादम, निवळी
२) कु.ऋद्धी मोहन कुलकर्णी, देवरूख
३) कु. स्वरूप मिलिंद काणे, कुवारबाव
वक्तृत्व स्पर्धा निकाल -
प्रथम - कु. ओंकार आठवले, रत्नागिरी
द्वितीय - कु. ऋद्धी कुलकर्णी, देवरूख
तृतीय - कु. मनस्वी नाटेकर, पाली
उत्तेजनार्थ
१. कु.स्मार्था कीर मिरजोळे
२ श्री. जयंत फडके, जांभूळआड, मेर्वी
३ कु. तपस्या बोरकर, रत्नागिरी.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कार्यकारी सदस्य ॲड. अविनाश काळे कार्यालय व्यवस्थापक सुधाकर वैद्य, अक्षय थत्ते, वसतिगृह व्यवस्थापक रविकांत शहाणे, अवंती काळे, अद्वैत काळे यांनी साह्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी