
अमरावती, 2 नोव्हेंबर (हिं.स.)गेल्या काही महिन्यांपासून साईनगर प्रभागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात तर कोणतीही वारा पाऊस , वादळ नसताना सुद्धा तर उन्हाळ्याच्या काळात ऐन उकाड्यात रात्रीच्या वेळी वीज बंद होत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. साईनगर परिसरात खंडित स्वरूपाचा विद्युत पुरवठा का होतो याबाबत अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मूळ समस्याचे निवारण करण्याच्या दृष्टीने उपाय योजनेचा भाग म्हणून रोहित्र (डीपी) वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत. भार वाढल्याने नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी भाजप नेते तुषार भारतीय यांच्या कडे केली असता श्री भारतीय यांनी अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून जिल्हा वार्षिक योजना मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली.अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केवळ साईनगर प्रभागातील ट्रांसफार्मर ची क्षमता वाढविण्यासाठी 1 कोटी 5 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला. ट्रांसफार्मर ची क्षमता वाढविण्याचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून अवघ्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ट्रांसफार्मरच्या क्षमता वाढीचा फायदा संपूर्ण साईनगर प्रभागाला होणार आहे . साईनगर प्रभागातील वीज समस्या बाबत घेतलेल्या पुढाकाराबाबत भाजप नेते तुषार भारतीय यांचे आभार मानले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी