
बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू असीम आझमी ३ नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते सकाळी साडेअकरा वाजता कवडगाव बुद्रुक या ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटुंबाची भेट घेणार आहेत. दुपारी एक वाजता ते पत्रकार देवेंद्र ढाका यांची भेट घेणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष खमरूल इमान खान यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
दिनांक तीन नोव्हेंबर रोजी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी सकाळी मुंबईहून विमानाने छत्रपती संभाजी नगर येथे दाखल होणार असून सकाळी साडेअकरा वाजता ते बीड येथील कवडगाव या ठिकाणी फलटण प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे. तर दुपारी एक वाजता बीड येथील पत्रकार देवेंद्र ढाका यांचे चिरंजीव यश खून प्रकरणात बीड़ विश्रामगृह याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis