
परभणी, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।
नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असताना प्रमुख पक्षाने न. प. निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी भाजप मानवत न. प. निवडणूक ताकदीने लढवणार असून शिवसेना शिंदे गटासोबत युतीसाठी चर्चा सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसांत निवडणुकीसाठी युतीवर चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री मेघना बोर्डीकर सर्व निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. युतीची चर्चा सुरू असतानाच मानवत पालिका नगराध्यक्षपदावर भाजपचा दावा असून मानवत शहरासाठी भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रंगनाथ सोळंके, अनंत गोलाईत, संदीप हंचाटे, हरिभाऊ निर्मळ, प्रदीप कदम, गणेश भरड उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis