
परभणी, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या उपस्थितीत रविवारी पाथरी येथील
शिक्षक कॉलनी परिसरातील तरुण, युवा नेतृत्व राजेश मस्के, वली पाशा यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला!
सईद भैया खान यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेऊन, राजेश मस्के यांनी “शिवसेना हीच जनतेची खरी ताकद” असा निर्धार व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या विचारांशी एकरूप होत, आता शिक्षक कॉलनीत शिवसेनेचा भगवा अधिक उंच फडकणार आहे! असे शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष खान यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis