
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत 'वाचनालय' सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकर जिल्ह्यातील सांगोला, अकलूज आणि करमाळा बस स्थानकावर असा वाचनकट्टा सुरू होणार आहे. ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे.एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नुकतीच केली.या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड