महापालिका अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा सोलापूर विकास मंचकडून जाहीर निषेध
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख व्यंकटेश चौबे यांनी केलेलं एक विधान त्यात ते म्हणतात की स्मार्ट सिटी एबीडी एरियात सहा महिने दररोज पाणी पुरवठा केला परंतु ते लाभार्थी नागरिक म्हणाले की ,आ
महापालिका अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा सोलापूर विकास मंचकडून जाहीर निषेध


सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख व्यंकटेश चौबे यांनी केलेलं एक विधान त्यात ते म्हणतात की स्मार्ट सिटी एबीडी एरियात सहा महिने दररोज पाणी पुरवठा केला परंतु ते लाभार्थी नागरिक म्हणाले की ,आम्हाला दररोज पाणी पुरवठा करु नका. या सरकारी अधिकाऱ्याचा आणि शहरातील नागरिकांचा दुरान्वयानेही संबंध राहिलेला नाही हेच या वक्तव्यावरून लक्षात येते. हा अधिकारी या पदासाठी पात्र नाही हेच याच्या या वक्तव्यावरून कळते. जनतेच्या करातून पगार घेणार्या या अधिकाऱ्यांना असे वक्तव्य करताना लाज कशी वाटली नाही? असा प्रश्न सामान्य सोलापूरकर विचारत आहे. सोलापुरात ४०% पाणी गळती आहे असे महापालिकेचे अधिकारी म्हणतात. (सोलापूर विकास मंचच्या अभ्यासानुसार १०-१२% पाणी गळती आहे.) ही गळती यांना बंद करता येत नाही. सकाळच्या वेळी पाणी पुरवठा करता येत नाही. काही ठिकाणी संध्याकाळी, कधी पहाटे चार वाजता, कधी दुपारी बारा वाजता पाणी पुरवठा करतात. चार पाच दिवसाआड करतात याच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही.स्वताचे प्रशासकीय कारभार मधील अपयश झाकण्यासाठी हे वाक्य प्रयोग केला असे स्पष्ट दिसुन येते अशा शासकीय सेवेत असताना केलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे सोलापुर ची प्रतिमेस कलंकित करणे यामुळे संबंध राज्यात सोलापुरच्या नावास वेगळे अपमानित केल्यासारखे भावना व्यक्त होते. व्यंकटेश चौबे यांच्या या वक्तव्याचा सोलापूर विकास मंच जाहीर निषेध करीत आहे. आयुक्तांनी अशा अकार्यक्षम अधिकाऱ्याची तातडीने हकालपट्टी करावी व अशा बेजबाबदार वक्तव्य बद्दल त्यांना कारणे दाखवा नोटिस देऊन यावर मागील सर्व काळात शासकीय सेवेत असताना असे नागरिकांचे मुलभूत सुविधा व अधिकार यावर मत व्यक्त करण्याचा अधिकार कोण दिला याबाबत विचारणा करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर विकास मंचने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande