पुणे-स्पर्श पेन्शनधारकांसाठी ‘डीएलसी’ मोहीम सुरू
पुणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.)संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील स्पर्श पेन्शनधारकांसाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ (डीएलसी) मोहीम ४.० सुरू झाली आहे. ही मोहीम १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, निवृत्तिवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर क
पुणे-स्पर्श पेन्शनधारकांसाठी ‘डीएलसी’ मोहीम सुरू


पुणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.)संरक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील स्पर्श पेन्शनधारकांसाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ (डीएलसी) मोहीम ४.० सुरू झाली आहे. ही मोहीम १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, निवृत्तिवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सुलभ आणि डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या उपक्रमाअंतर्गत देशभरातील ४०० हून अधिक विभागीय सेवा केंद्रे तसेच सुमारे ४.५ लाख ‘कॉमन सर्व्हिस सेंटर्स’ (सीएससी)मार्फत पेन्शनधारकांना ‘रिअल टाइम’ ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ सादर करण्याची सुविधा मिळणार आहे. नवी दिल्ली येथील संरक्षण खात्याचे मुख्य लेखा नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मुख्यालयाच्या ‘प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स’ (पीसीडीए) विभागाने या मोहिमेची स्थानिक पातळीवर तयारी पूर्ण केली आहे. पुणे आणि आसपासच्या भागातील सर्व संरक्षण पेन्शनधारक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande