
बीड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। उद्या दिनांक 3 नोव्हेंबर सोमवारी संसदरत्न खा.सुप्रिया सुळे या डॉ.संपदा मुंडे यांच्या निवासस्थानी कवडगाव, ता.वडवणी जिल्हा बीड येथे त्यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
बीड जिल्ह्यातील कवडगाव येथील डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येेथे आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान कवडगाव येथे राजकीय नेत्यांची दौरे सुरू झाले असून कुटुंबीयांचे सांत्वन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी कवडगाव येथे येणार आहेत. त्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज देण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis