“भक्तीभावाने उजळली ताकई नगरी : बोंबल्या विठोबाच्या यात्रेचा शुभारंभ”
रायगड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळापासून अखंड परंपरेने सुरू असलेली खोपोलीजवळील ताकई येथील बोंबल्या विठोबाची कार्तिकी यात्रा आजपासून भक्तीमय वातावरणात सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिकी एकादशीपासून प
“भक्तीभावाने उजळली ताकई नगरी : बोंबल्या विठोबाच्या यात्रेचा शुभारंभ”


रायगड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळापासून अखंड परंपरेने सुरू असलेली खोपोलीजवळील ताकई येथील बोंबल्या विठोबाची कार्तिकी यात्रा आजपासून भक्तीमय वातावरणात सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिकी एकादशीपासून पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेला ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकईतून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली.

या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक दरवर्षी ताकईत दाखल होत असतात. भक्तगणांच्या सोयीसाठी देवस्थान कमिटी तसेच खोपोली नगरपरिषद यांच्यावतीने पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वीज व्यवस्था आणि वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंत गोविंद पाटील, उपाध्यक्ष जयवंत लक्ष्मण पाटील, सचिव काळूराम महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी एकत्रितपणे नियोजनाची जबाबदारी पार पाडली आहे.

पावसाचे वातावरण असल्याने पहिल्या दोन दिवसांत काहीशी गैरसोय होण्याची शक्यता असली तरी देवस्थान कमिटीने चोख व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले. भक्तिगीत, कीर्तन, भजन, अभिषेक व महाप्रसादाच्या कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तीचा जल्लोष ओसंडून वाहू लागला आहे.

यामध्ये रघुनाथ शंकर पाटील, पांडुरंग शिवराम विचारे, सुनील गोटीराम पाटील, रामदास गोविंद पाटील, सुधीर वसंत पाटील, गौरू लहू पाटील, काशिनाथ नामदेव पाटील, प्रकाश राजाराम शहाणे, काळूराम बाळाराम ढमाले, संजय नारायण पाटील, नारायण दामू पाटील, नरेंद्र नटवरलाल शहा आणि तानाजी मारुती पाटील हे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande