नाशिक : ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वेक्षण पथक फिरले माघारी
नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी जागा भू संपादन प्रक्रियेचा सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला असून हे पथक विरोधामुळे परत फिरावे लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसापासून सात
सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांच्या विरोधाने परत फिरावे लागले.


नाशिक, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी जागा भू संपादन प्रक्रियेचा सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला असून हे पथक विरोधामुळे परत फिरावे लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसापासून सातत्याने नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढवण बंदराला रस्ते जोडण्याच्या निमित्याने जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर नासिक या तालुक्यातून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन कराव्यात त्यासाठी म्हणून शासनाने वेगवेगळ्या स्तरावरती कारवाई सुरू केलेली आहे नासिक त्रंबकेश्वर हा रस्ता सहा पदरी व्हावा त्यासाठी म्हणून नाशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तर काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे तर दुसरीकडे वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी म्हणून मुंबई आग्रा महामार्ग ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या कामासाठी म्हणून घोटी या ठिकाणावरून जागा भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

सर्व प्रकरणात आता शासनाने घोटी ते त्र्यंबक या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी पथक पाठवलं होतं या पथकाने सर्वेक्षणाला सुरुवात केल्यानंतर खंबाळे, डहाकेवाडी, आहुर्ली , या गावांमध्ये ज्यावेळी सर्वेक्षणाचे पथक दाखल झाले त्यावेळी येथील नागरिक एकत्र झाले आणि त्यांनी या पथकाला तीव्र विरोध केला नागरिकांनी कोणत्या कायद्यान्वये तुम्ही सर्वेक्षण करत आहात ते सांगा ग्रामस्थांना सर्वेक्षण करण्याबाबतच्या नोटिसा दिले आहेत का या स्वरूपाचे प्रश्न विचारून सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सुळोकि पळव केले परंतु या पथकाकडे कोणतेही उत्तर नव्हते पथकातील अधिकारी हे याबाबत फक्त टेंडर नोटीस प्रकाशित झाली आहे अशा स्वरूपाचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत होते परंतु ग्रामस्थांचा असलेला विरोध यामुळे सर्वेक्षणासाठी गेलेले पथक हे खाली हाताने परत आलेले आहे. आता येणाऱ्या काळामध्ये सर्वेक्षण करण्यासाठी पुन्हा प्रशासनाचे पथक जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या सर्व प्रकरणी आता पुन्हा एकदा आंदोलन करणारे शेतकरी संतप्त झाल्या असून हे सर्वजण सोमवारी सकाळी आंदोलन स्थळावरती बैठक घेणार आहे त्यातून पुढे काय मार्ग काढायचा यावर विचार होणार आहे. जास्तीत जास्त पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलन स्थळी उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande