औसा शहराच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उद्योजक व प्लॉटधारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। औसा शहराच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी औसा एमआयडीसी परिसरातील उद्योजक व प्लॉटधारकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार, स
औसा शहराच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी


लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।

औसा शहराच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिक उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी औसा एमआयडीसी परिसरातील उद्योजक व प्लॉटधारकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार, संबंधित अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान उद्योजकांनी औसा एमआयडीसीतील विविध प्रश्न मांडले. त्यात राष्ट्रीय महामार्गावरून एमआयडीसीमध्ये प्रवेशासाठी केवळ एकच रस्ता असणे, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची देखभाल, परिसरातील पथदिवे बंद पडणे, रात्री मद्यपींकडून होणारा त्रास, तसेच दर मंगळवारी जाणारी वीज यांसारख्या समस्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.या सर्व विषयांवर आमदार अभिमन्यू पवार यांनी सविस्तर चर्चा केली. काही तातडीच्या प्रश्नांवर बैठकीतच निर्णय घेण्यात आला आणि संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या. उद्योजकांच्या मागण्यांबाबत संवेदनशील भूमिका घेत आमदार पवार यांनी सांगितले की, ‘औसा शहराचा औद्योगिक विकास ही प्राधान्याची बाब आहे. उद्योजक हा विकासाचा कणा असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.’

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande