लातूर : आटोचालकांकडून 1.47 लाखांचा दंड वसूल
लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्याच्या उद्देशाने लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नंबर प्लेट, बुलेट सायलेन्सर, बेशिस्त ऑटोरिक्षाचालकांच्या विरोधात धडक कारवाई केली ज
लातूर : आटोचालकांकडून 1.47 लाखांचा दंड वसूल


लातूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्याच्या उद्देशाने लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नंबर प्लेट, बुलेट सायलेन्सर, बेशिस्त ऑटोरिक्षाचालकांच्या विरोधात धडक कारवाई केली जात आहेत. यादरम्यान शहरातील २०७ ऑटोरिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यात वाहूक कोंडी कमी व्हावी, वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून महानगरपालिका, बस डेपो, विभागीय कार्यालय राज्य परिवहन मंडळ, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार केला अबाहे. बेशिस्तपणे ऑटोरिक्षा रोडच्या मध्यभागी थांबवून प्रवाशी चढ-उतार करणारे ऑटोरिक्षाचालका, फं्रटसीट घेणारे ऑटोरिक्षाचालक, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे वाहनधारकांवर दररोज केसेस केल्या जात आहेत.

लातूर शहरातील वाहनांवर बेकाशदेशीर क्रमांक जसे की, मामा, दादा, बाबा आदी सार्वजनिक ठिकाणी लोकांना धोका, अडथळा किंवा गैरसोय होईल, अशा प्रकारे वाहने उभी करणारे वाहनचालक, बुलेट सायलेन्सर(इंदौर फटका), ब्लॅक फिल्म, विना लायसन वाहन चालवणे, ट्रिपल सीट, दुचाकीची कागदपत्रे नसने, वाहतूक चिन्हांचा भंग करणारे, नंबर प्लेट नसणे, हेल्मेट नसणे, आदी वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत २०७ ऑटोरिक्षाचालकांवर कारवाई करुन १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. इंटरे सेप्टर वाहनाद्वारे ओव्हर स्पीडच्या ५१ केसेस करुन १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ज्या ऑटोरिक्षांचे अनपेड ई-चलान भरणे थकीत आहे त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande