नागपुरातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
नागपूर, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अंदाजे दहा दिवसांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होणार असल्याने हे मतदान संपल्यानंतरच अधिवेशनाची सुरुवात
संग्रहित लोगो


नागपूर, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अंदाजे दहा दिवसांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होणार असल्याने हे मतदान संपल्यानंतरच अधिवेशनाची सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नागपुरात सुरू होते अशी परंपरा आहे. परंतु, यंदा राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे बहुतांश पक्षांमधील नेते या निवडणुकांमध्ये व्यस्त राहणार आहेत. हे लक्षात घेता यंदा विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकलले जाऊ शकते असे बावनकुळे यांनी सांगितले. यापूर्वी, 2021 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या होत्या, तेव्हाही सर्व पक्षांनी अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यंदा राज्य विधीमंडळाचे अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती. परंतु, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे हे मतदान आटोपल्यानंतरच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande